Pages Navigation Menu

Latest National, International News Of Political, Sports, Share Market, Crime & Entertainment

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (UEL) चे पहिले भारतीय कार्यालय पुण्यात सुरु

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (UEL) चे पहिले भारतीय कार्यालय पुण्यात सुरु

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (UEL) चे पहिले भारतीय कार्यालय पुण्यात सुरु

आता आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीत पोहोचलो आहोत पण UEL  दुसऱ्या औद्योगिकीय क्रांतीपासून म्हणजेच १८९८ पासून कार्यरत असून भविष्यातील औद्योगिक क्रांतीसाठी नेतृत्व तयार करीत आली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन हे नेहमीच नेतृत्व तयार करणारे विद्यापीठ म्हणून ओळखले गेले आहे. UEL मधील विद्यार्थी कंपन्यांची पहिली पसंती बनतील यासाठी संस्था सतत कार्यरत असते आणि नवीन अभ्यासक्रम तयार करीत असते.

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (UEL) हे लंडन बरो ऑफ न्यूहॅम, लंडन, इंग्लंड येथील एक सार्वजनिक विद्यापीठ आहे, याची स्थापना १८९८ मध्ये करण्यात आली होती. तर १९९२ मध्ये याला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. आता UEL  भारतातील आपले पहिले कार्याल.पुणे येथे सुरु करीत आहे.

युनिव्हर्सिटीचे पूर्व लंडनमध्ये तीन कॅम्पस आहेत, एक रॉयल डॉकलँड्समध्ये आणि इतर दोन स्ट्रॅटफोर्डमध्ये आहेत. जागतिक आर्थिक केंद्र असलेल्या कॅनरी व्हार्फपासून कॅम्पस फक्त १० मिनिटांच्या अंतरावर आहे.

“आम्ही करिअर नेतृत्व तयार करणारे विद्यापीठ आहोत, सध्या औद्योगिक क्षेत्रात सतत बदल होत असून या बदलांसाठी आवश्यक कौशल्ये, भावनिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतोअसे पूर्व लंडन विद्यापीठाचे रिक्रूटमेंट संचालक डॅनियल कफ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दहा वर्षांच्या प्रवासासाठीचा म्हणजेच २०२८ पर्यंतचा रोड मॅप ईस्ट लंडन विद्यापीठाने तयार केला आहे. त्याअंतर्गत नवा अभ्यासक्रम, नवीन अध्यापनशास्त्र, संशोधन आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही १० वर्षांची नवीन रणनीती तयार करण्यात आली आहे. सगळ्यांच्या सहकार्याने या नव्या रणनीतीची अंमलबजावणी आम्ही सुरु करीत आहोत.

“यूकेमधील करिअर केंद्रीत उद्यमशील विद्यापीठ म्हणून आमचे नाव व्हावे अशी आमची महत्त्वाकांक्षा आणि उद्दिष्ट आहे आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकऱ्यांसाठी तयार करणे आणि त्यांना सर्वसमावेशक शाश्वत भविष्य प्रदान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.” असेही डॅनियल कफ यांनी यावेळी सांगितले.

पुण्याच्या हयात रिजन्सी येथील आइन्स्टाईन आणि न्यूटन हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत डॅनियल कफ बोलत होते. पूर्व लंडन विद्यापीठ आणि लंडन, इंग्लंड, यूके आणि अॅशले. वेरेस येथील  ग्लोबल एज्युकेशन सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि विद्यापीठ भागीदारी सांभाळणारे अमोल वर्पे,  मालव्हर्न इंटरनॅशनलचे ग्लोबल सेल्स हेड ही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. भारतातील इंडस्ट्री ४.० रोजगाराला चालना देण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनची धोरणात्मक रणनीती यावेळी जाहीर करण्यात आली. यूके सार्वजनिक विद्यापीठाचे पहिले दक्षिण आशियातील कार्यालय पुण्यात ग्लोबल स्टुडंट सेंटर नावाने सुरु करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

पुण्यातील तरुणांची क्षमता पाहता विद्यापीठ पुण्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यवस्थेचा लाभ देण्यासाठी ग्लोबल स्टुडंट सेंटरच्या कार्यालयांचा विस्तारही केला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

“गेल्या काही वर्षांत संपूर्ण जगात व्यस्तता वाढली आहे. ती पाहाता विद्यापीठ सहकार्याच्या क्षेत्रांचा विस्तार करण्याची आमची इच्छा आहे. त्यासोबत आम्हाला आतापर्यंत मिळालेल्या यशाची माहितीही आम्ही देऊ पाहात आहोत.चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये शिक्षण आणि उद्योगाच्या तयारीत जागतिक समुदायांसोबत विद्यापीठाचे व्हिजन २०२८ शेअर करू इच्छित आहोत असेही डॅनियल कफ यांनी स्पष्ट केले.

At the University of East London Leading  Careers meet — Daniel Cuffe- Director of Recruitment at University of East London (third from left), Amol Varpe, Managing Director – Global Student Centre ( second from left) Ashleigh Veres – Global Head of Sales and Marketing at Malvern International Pathway partner of UEL (fourth from left), Pavel Bawa – Senior Regional Manager – South Asia, Pallavi Sharma,  Recruitment Advisor – South Asia, Prateek Gupta, Recruitment Advisor – South Asia and Maulik Arya, Senior Recruitment Advisor – South Asia (first left).


Amol Varpe (Director, GSC), Rohit Sharma (Ceo, QuinDara Events), Bushra Shaikh (Production Designer, QuinDara Events), Agnieszka Varpe (HR director GSC),


ग्लोबल स्टुडंट सेंटर सुरु करण्यामागचा उद्देश-

  • शिक्षण, अध्यापनशास्त्र, संशोधन आणि भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी कौशल्याने सुसज्ज करू शकेल यासाठी भागीदारी आणि सहयोग मजबूत करणे. यामुळे प्रगत शिक्षण, ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संधींनी भरलेल्या जगाची कल्पना विद्यार्थ्यांना प्राप्त होईल.
  • भारतातील उद्योग क्षेत्रासाठी व्यावसायिक पदवीधर तयार करण्यासाठी भागीदारी करणे
  • युनिव्हर्सिटीच्या प्रमुख क्षेत्रांबद्दल आणि २०२२ साठी नवीन प्रक्रिया आणि नवीन अभ्यासक्रमांच्या संदर्भात परिवर्तनातील नवीनतम गोष्टींसाठी माल्व्हर्न इंटरनॅशनल – युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनसोबत भागीदारी करणे;
  • व्यवसायात भारतातील भागीदारांना समर्थन देण्यासाठी आणि UK मध्ये उच्च शिक्षणासाठी विषेषत्वाने तयार केलेल्या सत्रांमध्ये भाग घेण्याची संधी

UEL बाबत

UEL ला जगातील अव्वल तरुण २०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळालेले आहे, त्याशिवाय मानसशास्त्र संशोधनाच्या प्रभावासाठी यूकेमध्ये पहिला, आर्किटेक्चरसाठी लंडनमध्ये दुसरा आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी तिसरा क्रमांक मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मदत आणि व्हिसा सल्ल्यासाठी देखील  UEL यूकेमध्ये पहिल्या व्या क्रमांकावर आहे. एवढेच नव्हे तर कॅम्पसमध्ये राहण्याची सुविधा देणारे लंडनमधील हे एकमेव विद्यापीठ आहे.

एकीकडे जागतिक बाजारपेठेत घट होत असताना, UEL मात्र भारतात विशेषतः पुण्यात विस्तार करीत आहे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (UEL) चे पहिले भारतीय कार्यालय पुण्यात सुरु

Print Friendly, PDF & Email